Anuradha Vipat
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लोहाचे प्रमाण वाढवणारे पदार्थ खाणे आवश्यक आहे.
बीट हे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.
पालकामध्ये भरपूर लोह आणि व्हिटॅमिन-सी असते, जे शरीराला लोह शोषण्यास मदत करते.
भिजवलेले काळे मनुके, खजूर आणि बदाम यांचे नियमित सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी झपाट्याने सुधारते.
डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीला चालना देतात.
गुळात लोह मोठ्या प्रमाणात असते, तर शेंगदाण्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
जर तुम्ही मांसाहारी असाल, तर अंडी आणि यकृत यांचा आहारात समावेश करा, कारण हे लोहाचे समृद्ध स्त्रोत आहेत.