Eye Health : आहारात घ्या 'हे' पदार्थ अन् डोळ्यांची कमजोरी होईल दूर

Mahesh Gaikwad

आरोग्याच्या समस्या

आजकालच्या धकाधकीच्या जीनवात आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही.

Eye Health | Agrowon

बदलती जीवनशैली

बदलती जीवनशैली आणि कॉम्प्युटर, मोबाईलचा वाढता वापर यामुळे अनेकांना डोळ्यांच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.

Eye Health | Agrowon

मोबाईलचा वापर

डोळे हा आपल्या शरिरारीत अवयवांपैकी सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. आजकाल लहानांपासून मोठ्यांना मोबाईलचे अक्षरश: व्यसन लागले आहे.

Eye Health | Agrowon

डोळ्यांची कमजोरी

मोबाईल आणि कॉम्प्युटर स्क्रिनाच्या अतिवापरामुळे अनेकांना डोळ्यांच्या कमजोरीची समस्या होत आहे.

Eye Health | Agrowon

दैनंदिन आहार

अशात आपल्या दैनंदिन आहारामध्ये काही गोष्टींचा अंतर्भाव केल्यास या समस्येपासून आराम मिळू शकतो.

Eye Health | Agrowon

व्हिटामिन - ए

डोळ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या 'व्हिटामिन-ए' ची शरीरामध्ये कमी झाल्यामुळे डोळे कमजोर होतात.

Eye Health | Agrowon

हाडांची मजबूती

व्हिटामिन-ए डोळ्यांची दृष्टी, त्वचा आणि हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खाल्ल्याने शरीरातील व्हिटामिन-एची कमतरता भरून निघते.

Eye Health | Agrowon

पालेभाज्या

अंडी, पालेभाज्या, गाजर, पपई हे व्हिटामिन-एचे उत्तम स्त्रोत आहेत. याशिवाय पालक, दही, सोयाबीन आणि इतर पालेभाज्याही खाणे फायद्याचे आहे.

Eye Health | Agrowon

जीवनसत्त्वे

व्हिटामिन-ए व्यतिरिक्त व्हिटामिन बी, बी १२, व्हिटामिन-सी आणि ई हे घटक देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

Eye Health | Agrowon

डोळ्यांचे आरोग्य

ड्रायफ्रूट्स, डाळी, लिंबू, आवळा यामधून ही जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे यांचे सेवन करणे डोळ्यांसाठी फायद्याचे आहे. ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे.

Eye Health | Agrowon