Roshan Talape
निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी आहारात काही खास पदार्थांचा समावेश महत्त्वाचा असतो. हे ७ पदार्थ तुमचे आरोग्य टिकवण्यास मदत करतात.
पालक, मेथी, सारख्या पालेभाज्यांमधून शरीराला लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात.
संत्री, सफरचंद, केळी, डाळिंब यांसारखी फळं शरीरातील पेशींचे संरक्षण करतात.
हृदयाचे आरोग्य, मेंदूची कार्यक्षमता आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी ओमेगा-३ फायदेशीर ठरते.
आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, त्वचा तजेलदार ठेवतो आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतो.
बदाम, अक्रोड, खजूर यांमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त चरबी, प्रथिनं आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
प्रथिनं, फायबर्स आणि लोह यांचा उत्तम स्रोत असलेल्या डाळी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
हळदीतील कुरकुमिन शरीरातील दाह कमी करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि कर्करोगास प्रतिबंध करते.