Roshan Talape
कांजी हे पारंपरिकपणे आंबवून तयार होणारे पेय आहे, जे शरीरासाठी लाभदायक ठरते.
कांजीचे मूळ जम्मू-काश्मीरमध्ये आहे, जिथे ते पारंपरिकपणे काळ्या गाजरांपासून तयार केले जाते.
फास्ट फूड आणि जंक फूडमुळे थकवा, तणाव आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यावर कांजी हे आंबवलेले नैसर्गिक पेय फायदेशीर ठरते.
कांजीमध्ये लाल तिखट, काळी मिरी, मोहरी, हिंग, सैंधव मीठ, आले आणि विविध भाज्यांचा वापर केला जातो.
कांजी तयार करताना वापरली जाणारी मोहरी, तिखट आणि काळी मिरी यामध्ये कर्करोग रोखणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात.
सैंधव मीठ हे शरीरातील खनिजांची पूर्तता करून पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते.
६०% बीट, ३०% गाजर आणि १०% मुळा यांचे मिश्रण सर्वात चांगली कांजी तयार करते.