Rain Update: राज्यात कोणत्या भागात पडणार पाऊस?

Team Agrowon

राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपिटीने तडाखा दिल्यानंतर दोन दिवसांपासून राज्यात धुक्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे.

Nashik Rain | Agrowon

दाट धुक्यामुळे काही अंतरावरील दिसनेही अशक्य होत असून, मोठ्या प्रमाणावर दव पडत आहे.

Rain Alert | Agrowon

आज (ता. ३) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.

Rain Update | Agrowon

तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्याजवळील ईशान्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Rain Update | Agrowon

या प्रणालीपासून आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पाऊस सुरूच आहे.

Rain Update | Agrowon

आज (ता.३) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

Rain Update | Agrowon