Milk Business : कोल्हापूरच्या शिखरे कुटुंबाने दुग्ध व्यवसायात गाठला नवा 'शिखर'

sandeep Shirguppe

शिखरे कुटुंब

कोल्हापूर जिल्ह्यातील मिणचे (ता. हातकणंगले) येथील सम्मेद सतीश शिखरे व दर्शन सतीश शिखरे या बंधूंची पाच एकर शेती.

Milk Business | agrowon

दुग्ध व्यवसाय

या शेतीच्या जोरावर संपूर्ण उच्चशिक्षीत कुटुंबाने दुग्ध व्‍यवसायाला प्राधान्‍य दिले आहे.

Milk Business | agrowon

शेतीपूरक यशस्वी काम

शेतीपूरक क्षेत्रात एकत्रितपणे काही तरी करायचे याच भावनेतून दुग्ध व्यवसाय सुरू करून तो यशस्वीही केला आहे.

Milk Business | agrowon

व्यवसायाचा प्रारंभ

दोन म्हशींपासून व्यवसाय सुरू केला, कालांतराने कर्जाने दहा म्हशी घेतल्या. त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून सहा महिन्यांत पुन्हा पाच म्हशी खरेदी केल्या.

Milk Business | agrowon

४० जनावरे

सध्‍या गोठ्यामध्ये ७ एचएफ गाई, तर २७ मुऱ्हा म्हशी आणि ६ वासरे आहेत. जनावरांच्‍या आरोग्याकडे प्राधान्याने लक्षकेंद्रित केल्याने ही प्रगती झाली.

Milk Business | agrowon

दोन गोठे

जनावरांच्या संख्येत हळूहळू वाढ केल्यानंतर सहा गुंठ्यात बंदिस्त व मुक्त संचार असे दोन गोठे उभारले.

Milk Business | agrowon

Milk Businessभाकड काळ कमी

एक म्हैस १ तारखेला व्यायली तर पुढच्‍या एक तारखेला म्हशीचे रेतन केले जाते. पहिला माज २१, दुसरा माज ४२ व्‍या दिवशी, तर तिसरा माज ४८ किंवा ५१ व्या दिवशी येतो.

Milk Business | agrowon

दूध उत्पादनात वाढ

दूध उत्पादनात वाढ मिळण्यासह म्हशीचे आरोग्यही चांगले राहते. गाभण म्हशींचे दूध आठव्या महिन्‍यात बंद केले जाते.

Milk Business | agrowon

म्हशीचे २५० लिटर दूध

गोठ्यात म्हशीचे २५० लिटर, तर गायीचे ७० लिटर दूध प्रतिदिन संकलित होते.

Milk Business | agrowon

४ लाखांपर्यंत उत्पन्न

दूध विक्रीतून दर महिन्याला सुमारे ४ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

Milk Business | agrowon

शेणापासून गांडूळ खत

शेणापासून गांडूळ खत तयार केले जाते. खर्च वजा जाता एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

Milk Business | agrowon

संपूर्ण कुटुंब राबते गोठ्यात

गोठ्यातील सर्व कामांची जबाबदारी शिखरे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने वाटून घेतली आहे. वडील सतीश शिखरे, आई सौ. शीला यांच्यासह सर्व जण गोठ्यात राबतात.

Milk Business | agrowon

महिला सदस्यांचा होतो सन्मान

घर सांभाळून दुग्ध व्यवसायात काम करणाऱ्या कुटुंबातील प्रत्येका महिला सदस्‍यांना दरमहा दहा हजार रुपये दिले जाते.

Milk Business | agrowon

असे आहे खाद्य नियोजन

हिरवा चारा म्हणून हत्तीघास, मका यांचा वापर. कोरडा चारा म्हणून कडबा आणि गहू भुस्सा. सरकी पेंड, हरभरा चुनी, गुळ इ.चा वापर.

Milk Business | agrowon