Anuradha Vipat
आजकालच्या धावपळीच्या युगात घरच्या घरी फराळ बनवण्याऐवजी रेडीमेड फराळ खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
बाजारातून तयार फराळ विकत घेताना आपली चव आणि आरोग्य दोन्ही सुरक्षित राहावे, यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे आपण या लेखात पाहणार आहोत.
फराळ खरेदी करण्यापूर्वी शक्य असल्यास तो चाखून पहा. जर फराळाला खवट किंवा जुन्या तेलाचा वास येत असेल, तर तो अजिबात खरेदी करू नका.
नेहमी हवाबंद पॅकिंग असलेलाच फराळ खरेदी करा. पॅकेटवर 'मॅन्युफॅक्चरिंग डेट' आणि 'बेस्ट बिफोर' आवर्जून तपासा.
फराळ नेहमी नामांकित, स्वच्छ आणि विश्वासू दुकानातून किंवा गृहोद्योगातून खरेदी करा. दुकानाला FSSAI चा परवाना आहे की नाही हे तपासा.
लाडू, बर्फी किंवा पेढे यांसारख्या गोड पदार्थांमध्ये अतिशय भडक रंगांचा वापर केला असल्यास ते विकत घेऊ नका.
पॅकेटच्या मागे दिलेल्या साहित्याची यादी नक्की वाचा. यामध्ये ट्रान्स फॅट, एमएसजी किंवा अतिप्रमाणात प्रिजर्व्हेटिव्ह्ज वापरले आहेत का, यावर लक्ष ठेवा.