Anuradha Vipat
मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा 'मी टाईम' घेणे अत्यंत गरजेचे आहे.
'मी टाईम' म्हणजे असा वेळ जो तुम्ही कोणत्याही दबावाशिवाय, जबाबदारीशिवाय आणि मोबाईल किंवा सोशल मीडियापासून दूर राहून फक्त स्वतःसाठी घालवता.
आठवड्यातून एकदा घेतलेला 'मी टाईम' मेंदूतील तणाव वाढवणारे 'कॉर्टिसोल' हे संप्रेरक कमी करतो, ज्यामुळे मन हलके आणि शांत होते.
'मी टाईम' आपल्या मनाला आणि शरीराला रीचार्ज करण्याचे काम करतो. स्वतःसोबत घालवलेला वेळ तुम्हाला दुप्पट ऊर्जा आणि उत्साह देतो.
'मी टाईम'मध्ये जेव्हा तुम्ही एकटे असता, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या आवडीनिवडी, विचार आणि भावना समजून घेण्याची संधी मिळते. यामुळे आत्मपरीक्षण करता येते .
तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट करता तेव्हा मेंदूला विश्रांती मिळते. यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता आणि क्रिएटिव्हिटी वाढते.
स्वतःसाठी वेळ काढल्याने मनातील चिडचिड कमी होते. शांत मनाने तुम्ही तुमच्या कुटुंबाशी आणि मित्रांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकता, ज्यामुळे नाती घट्ट होतात.