Team Agrowon
मधमाशांपासून मध, मेण असे मौल्यवाम पदार्थ मिळतात याशिवाय मधमाशा परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
परागीभवन म्हणजे वनस्पतीमधील प्रजननाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे फळे, फुले आणि महत्वाचं म्हणजे धान्याच उत्पादन मिळतं.
मधमाश्याशिवाय वनस्पतीमधील परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. परागीभवन झाले तरंच वनस्पती आपले बीज तयार करत असते.
मधमाशा नाहीशा झाल्या तर परागीभवन थांबेल आणि उत्पन्न घटून अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल.
पण अलीकडे रासायनिक किटकनाशकांचा वापर वाढल्यामुळे हानीकारक किडींसोबत मधमाशीसारख्या मित्रकिटकांची संख्या देखील कमी होत आहे.
एका रिपोर्टनुसार जगातील 70 टक्के शेती ही कीटकांवर अवलंबून आहे.
मधमाशी हा पृथ्वीवरील छोटासा जीव पण पण तिचं निसर्गसाखळीत खूप महत्त्व आहे. त्यामुळे मधमाशी संवर्धनासाठी प्रयत्न होणं गरजेच आहे.