Anuradha Vipat
श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. श्रावण महिन्यात रंगांना खूप महत्व आहे
भगवा रंग कावड यात्रेमध्ये विशेषतः वापरला जातो. हा रंग भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे.
श्रावण महिन्यात इतर रंगांनाही महत्व आहे. पिवळा रंग काही धार्मिक विधींमध्ये वापरला जातो.
हिरवा रंग निसर्गातील हिरवळ आणि समृद्धीचे प्रतीक आहे.हा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे
श्रावण महिन्यात हिरवा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. महिला हिरव्या रंगाच्या साड्या, बांगड्या आणि मेहंदी लावून नटतात.
पांढरा रंग भगवान शिवाला प्रिय आहे, त्यामुळे पांढरे वस्त्र श्रावणात पूजेसाठी वापरले जाते
श्रावण महिना निसर्गाच्या विविध रंगांनी भरलेला असतो