Anuradha Vipat
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे हे निरोगी आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक गरज आहे.
आपले आरोग्य बऱ्याच अंशी आपल्या तोंडाच्या स्वच्छतेवर अवलंबून असते.
आपण दिवसभरात जे काही खातो, त्याचे बारीक कण दातांच्या कोपऱ्यात अडकून राहतात. रात्री झोपताना रात्री ब्रश केल्याने हे अन्नकण निघून जातात आणि बॅक्टेरियांची वाढ रोखली जाते.
जर रात्री दात घासले नाहीत, तर जंतू दातांमधील अन्नावर प्रक्रिया करून ॲसिड तयार करतात. हे ॲसिड दातांचे कवच खराब करते.
रात्री ब्रश केल्यामुळे सकाळी उठल्यावर तोंडातून येणारी दुर्गंधी कमी होते आणि श्वास ताजेतवाने राहतात.
नियमित दोन्ही वेळा ब्रश केल्याने हिरड्यांमधून रक्त येणे किंवा सूज येणे यांसारखे आजार होत नाहीत.
तोंडात वाढणारे हानिकारक बॅक्टेरिया लाळेसोबत पोटात जातात. यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.