Vatpournima 2024 : वटवृक्ष संवर्धनाचा वसा घेऊ वटपौर्णिमा साजरी करु

Team Agrowon

आज वटपौर्णिमा. या दिवशी महिला आपल्या पतीला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

Vatpournima 2024 | Agrowon

पौराणिक कथा काहीही असली तरी वटवृक्षाचे संगोपन आणि संवर्धन गरजेचे आहे, हा संदेश या दिवशी सर्वदूर पोहोचला पाहिजे.

Vatpournima 2024 | Agrowon

भारतातील अनेक शहरात आणि गावागावांत प्राचीन आणि दीर्घायुषी वडाचे वृक्ष आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे.

Vatpournima 2024 | Agrowon

आपल्याला जीवन जगण्यासाठी सर्व अर्थाने वृक्षच जन्मोजन्मी राहिले पाहिजेत. हा संकल्प आणि सिद्धी खऱ्या अर्थाने वटसावित्री पौर्णिमेचा अर्थ आहे.

Vatpournima 2024 | Agrowon

वडाची फळे लालचुटूक, गोलाकार आणि पानांच्या देठालगत जोडीजोडीने असतात. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात.

Vatpournima 2024 | Agrowon

पानांच्या पत्रावळी जेवणाकरिता उपयोगाच्या आहेत. मुळे-पाने-चीक आणि साल या सर्वांचा औषध म्हणून उपयोग होतो.

Vatpournima 2024 | Agrowon

अशा या बहुगुणी उपयोगामुळे धार्मिक अंगाने वडाच्या झाडाला महत्त्व दिलेले असावे. एक दिवस त्याची पूजा करणे प्रासंगिक आहे, पण नित्यनेमाने झाडाची देखभाल गरजेची आहे.

Vatpournima 2024 | Agrowon
आणखी पाहा....