Anuradha Vipat
चक्कर येताच उभे राहणे किंवा चालणे त्वरित थांबवा. खाली पडून दुखापत होऊ नये म्हणून ताबडतोब जमिनीवर किंवा बेडवर बसा अथवा झोपा.
जर रुग्ण पाठीवर झोपला असेल, तर त्यांच्या पायांखाली उशी किंवा कोणतीही वस्तू ठेवून पाय हृदयाच्या पातळीपेक्षा थोडे वर करा.
रुग्णाच्या गळ्याभोवतीचे घट्ट कपडे, टाय किंवा स्कार्फ सैल करा, जेणेकरून त्यांना श्वास घेणे सोपे होईल.
रुग्णाच्या अवतीभवती गर्दी करू नका. खिडक्या उघड्या ठेवा आणि पंखा सुरू करा जेणेकरून शुद्ध हवा मिळेल.
चटकन मान हलवणे टाळा. थोडे शांत राहून डोळे बंद केल्याने मेंदूला स्थिर होण्यास मदत होते.
रुग्ण पूर्ण शुद्धीवर आल्यावर त्यांना ओआरएस , लिंबू-पाणी किंवा साखरेचे पाणी हळूहळू पिण्यास द्या.
रक्तातील साखर अचानक कमी झाल्यामुळे चक्कर येऊ शकते. अशा वेळी त्यांना ताबडतोब चॉकलेट, बिस्कीट किंवा एक चमचा साखर खायला द्या.