Anuradha Vipat
घसा खवखवणे आणि खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी आल्याचा रस मधासोबत घेणे हा सर्वात प्रभावी आणि घरगुती उपाय आहे .
आल्यामध्ये 'जिंजरॉल'नावाचे सक्रिय घटक असते, ज्यामध्ये दाहशामक आणि वेदनाशामक गुणधर्म असतात.
आल्याचा छोटा तुकडा किसून त्याचा एक चमचा रस काढा. त्यात एक चमचा शुद्ध मध मिसळा. हे मिश्रण दिवसातून २ ते ३ वेळा चाटावे.
किसलेले आले, तुळशीची पाने आणि काळी मिरी टाकून पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. हे पाणी गाळून त्यात थोडे मध मिसळून कोमट चहासारखे प्या.
आल्याचा एक छोटा तुकडा सोलून घ्या आणि त्यावर थोडे सैंधव मीठ टाका. हा तुकडा तोंडात ठेवून चघळा आणि त्याचा रस हळूहळू गिळा.
पाण्यात आले चांगले उकळून घ्या. त्यात थोडी चहापत्ती आणि गूळ घालून दूध न टाकता चहा बनवा.
एक ग्लास पाण्यात आले किसून उकळा. या पाण्यात चिमूटभर हळद घालून दिवसातून दोन वेळा गुळण्या करा. यामुळे घशातील जंतू मरतात