Monsoon 2024 : मॉन्सूनचे 'अच्छे दिन' ; यंदा चांगल्या पावसाचा IMD चा अंदाज

Mahesh Gaikwad

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

देशातील शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिली आहे.

Monsoon 2024 | Agrowon

भारतीय हवामानशास्त्र विभाग

आगामी मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने पावसाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे.

Monsoon 2024 | Agrowon

मॉन्सूनचा पाऊस

यंदाच्या मॉन्सूनमध्ये देशात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

Monsoon 2024 | Agrowon

पावसाचा अंदाज

आगमी मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर आयएमडीने पत्रकार परिषद घेत या वर्षीचा पावसाचा अंदाज जाहीर केला.

Monsoon 2024 | Agrowon

सरासरीपेक्षा कमी

ईशान्य भारत आणि आणि पूर्व भारताच्या काही भागामध्ये मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

Monsoon 2024 | Agrowon

चांगल्या पावसाचा अंदाज

देशात जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात चांगल्या पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

Monsoon 2024 | Agrowon

महाराष्ट्रात पाऊसमान चांगले

महाराष्ट्रातील बहुतांशी भागातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले.

Monsoon 2024 | Agrowon