sandeep Shirguppe
प्रथिने आणि पोषणयुक्त डाळींचा आपल्या आहारात नियमित समावेश असेल तर वजन कमी होण्यास मदत होते.
आपल्या आरोग्यास फायदेशीर असणारी डाळ म्हणजे हरभरा डाळ आपल्याला माफक दरात उपलब्ध होते.
तुम्ही इतर खाद्यपदार्था सोबत हरभरा डाळीचा समावेश करू शकता. यात प्रथिने, झिंक, कॅल्शियम, प्रोटीन, फोलेट असते.
अशक्तपणा असणाऱ्यांनी आहारात हरभरा डाळीचा समावेश करावा ज्यामुळे तुमचे पोट ही भरेल आणि वजन नियंत्रणात राहील.
अनेकांना लट्ठपणाची चिंता असते. हरभरा डाळीचा उपयोग लठ्ठपणा कमी करण्यासाठी होतो.
हरभरा डाळीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते.
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात हरभरा डाळीची समाविष्ट करा. यात प्रथिनांचे प्रमाण जादा असते.
एनर्जीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हरभरा डाळ खाल्ली पाहिजे.
शरीराला गरजेचे असणारे झिंक, कॅल्शियम, प्रोटीन, फोलेट असतात. जे एनर्जी वाढवण्यास मदत करतात.