sandeep Shirguppe
बीटच्या विशेष चवीमुळे सॅलड्सह त्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत.
बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार बनते.
बीटमध्ये कॅलरीज कमी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे पोषक तत्व भरपूर असतात.
प्रथिने, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत म्हणून बीटला ओळखलं जातं.
नियमित आहारात बीटचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते.
बीटचे आरोग्यदायी फायदे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
बीटचे सेवन केल्याने पचनक्रिया, बद्धकोष्ठतासारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात.
तज्ज्ञांच्या मते, बीटरूटचे सेवन स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. तसेच शरीरात ऑक्सिजन वाढतो.