Roshan Talape
घरात ढेकूण झालेत का? त्यांच्यामुळे त्रास होतोय? हे घरगुती उपाय करून नैसर्गिकरित्या ढेकूण दूर करा.
लिंबाचा रस पाण्यात मिसळून फवारणी केल्यास ढेकूण दूर होतात.
डायटोमेशियस अर्थ ही नैसर्गिक पावडर ढेकूणाच्या शरीरावर लागल्यास त्यांना निर्जलीकरण करून नष्ट करते.
उकळते पाणी गाद्या, उशा किंवा पलंगाच्या कोपऱ्यांवर टाकल्यास ढेकूण मरतात.
स्टीमरच्या वाफेने पलंग आणि गाद्यांवर उपचार केल्यास ढेकूण नष्ट होतात.
लसणाचा वास ढेकूंना सहन होत नाही. लसूण कुटून त्या जागी ठेवा.
कडूलिंबाची पाने उशी आणि गाद्यांखाली ठेवल्यास ढेकूण पसरणे थांबते.
टी ट्री ऑईल पाण्यात मिसळून फवारल्याने ढेकूण मरतात.
हे उपाय नियमित केल्यास घर ढेकूणमुक्त राहील आणि झोपही शांत लागेल!