Roshan Talape
अंड्याचा पिवळा आणि पांढरा भाग दोघेही पौष्टिक असतात, पण त्यांचा आरोग्यावर वेगळा परिणाम होतो.
अंडाच्या पिवळ्या बलकात व्हिटॅमिन्स आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात, जे मेंदू आणि दृष्टीसाठी उपयोगी ठरतात.
अंड्याचा पांढरा भाग प्रथिनांनी भरलेला असतो आणि त्यात चरबी कमी असल्याने तो वजन कमी करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
प्रथिनांची गरज असल्यास पांढरा भाग फायदेशीर, पण बलकासह अंडे खाल्ल्यास अधिक ऊर्जा मिळते.
लहान मुलांसाठी बलक महत्त्वाचा असतो, कारण तो मेंदूच्या विकासासाठी आवश्यक पोषकद्रव्ये देतो.
डाएट करताना पांढऱ्या भागाला प्राधान्य द्यावे, कारण त्यात कमी कॅलोरी आणि जास्त प्रथिने असतात.
बलकात नैसर्गिक कोलेस्टेरॉल असतो. हृदयरुग्णांनी तो मोजक्याप्रमाणात घ्यावा, पण पूर्णपणे टाळण्याची गरज नाही.
दोन्ही भाग आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात निवड करा.