Animal Heat Stroke : उष्माघात टाळायचा असेल तर जनावरांना असं खाद्य द्या

Team Agrowon

उष्ण तापमानात जनावरांचे खाद्य सेवन कमी होते, त्यामुळे योग्य त्या प्रमाणात ऊर्जा शरीराला मिळत नाही. अशा परिस्थितीत दैनंदिन आहारमधील चाऱ्याचे प्रमाण कमी करून आपण कॉन्सन्ट्रेट्सचे प्रमाण वाढवू शकतो. यामुळे ऊर्जेची घनता वाढण्यास मदत होईल.

Animal Heat Stroke | Agrowon

खाद्यामध्ये अचानक बदल करू नये करावयाचा असल्यास टप्प्याने करावा. खाद्य सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. 

Animal Heat Stroke | Agrowon

आहाराची तसेच खाद्याची घनता वाढवावी, जेणेकरून कमी सेवन केले असता जास्त ऊर्जा मिळेल. खनिज मिश्रणाचा योग्य प्रमाणात समावेश करावा. 

Animal Heat Stroke | Agrowon

जनवारांसाठी स्वच्छ पाण्याची सोय करावी.  

Animal Heat Stroke | Agrowon

उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७ टक्क्यांपेक्षा जास्त फॅटचा समावेश करू नये. यामुळे जनावरांना पचन संस्थेचे विकार होऊ शकतात. तंतुमय घटकांचे पचन नीट होत नाही.

Animal Heat Stroke | Agrowon

मुरघास बुरशीविरहित असावा. खाद्य घटकांचा वास येत असल्यास देऊ नये. 

Animal Heat Stroke | Agrowon

जनावरे एखादा विशिष्ट खाद्य घटक निवडून खात असल्यास त्याकडे लक्ष द्यावे. 

Animal Heat Stroke | Agrowon