sandeep Shirguppe
काळे मनुके दुधात मिसळून खाल्ल्याने पोषण पचनासह अनेक आजार बरे करण्यास मदत होते.
काळ्या मनुक्यांमध्ये कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळते. शिवाय, दुधात मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळतात.
दुधात भिजवून काळे मनुके खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. हाडातील वेदनाही कमी होतात.
काळ्या मनुकांमध्ये पोटॅशिअम आणि कॅल्शिअम आढळते. जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
दुधात काळे मनुके भिजवून खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
दुधात भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते.
वजन वाढवण्यासाठी दुधात भिजवलेले काळे मनुके खाल्ल्यास अनेक फायदे होतात.
दुधात मनुके भिजवून खाल्ल्याने शरीराला भरपूर कॅलरीज मिळतात. ज्यामुळे ऊर्जा वाढते.