sandeep Shirguppe
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी आले आहेत.CM Eknath Shinde Farm
ते दिवसभर आपल्या शेतीत रमले होते. त्यांनी औषधी फळे, फुळे यासह जनावरांच्या सेवेत आपला दिवस घालवला.
हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली.
मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे व आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो.
जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
"शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना; पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात असे एकनाथ शिंदे म्हणाले.
गाव, शेती, गावाकडची माणसे यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते.
माणूस गावापासून कितीही दूर गेला, कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या मातीबद्दल गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढविणारी पिके घ्यावीत, असे सांगून सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.