Diffuser Irrigation Method : कमी पाण्यात फळबाग जगवायचा सोपा उपाय

Team Agrowon

डिफ्यूजर सिंचन पद्धत ही फळबागेच्या सिंचनासाठी वापरतात.

Diffuser Irrigation Method | Agrowon

फळझाडाच्या जवळ ९ इंच खोलीपर्यंत तळाशी छीद्र असलेली मातीची भाजलेली भांडी पुरतात.

Diffuser Irrigation Method | Agrowon

मातीच्या भांड्यामध्ये ठिबकद्वारे थेंब थेंब पाणी पडते. भांड्याच्या तळाच्या छिद्रातून थेंब बाहेर पडताना तो १०० पेक्षा अधिक तुकड्यात रूपांतर होऊन आडवा पसरत जातो.

Diffuser Irrigation Method | Agrowon

हे पाणी जमिनीपासून नऊ इंच खोल जाते. झाडाची पाणी शोषणारी मुळे ही जमिनीपासून नऊ इंच ते एक फुटावर असतात.

Diffuser Irrigation Method | Agrowon

या भांड्यातील पाणी सरळ मुळापर्यंत जात. जमिनीच्या वरील थरामध्ये पाणी जात नसल्यामुळे पाण्याच बाष्पीभवन होत नाही.

Diffuser Irrigation Method | Agrowon

असे पाणी वाया जात नसल्यामुळे नेहमीच्या ठिबक व तुषार सिंचनापेक्षाही २० ते ३० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते.

Diffuser Irrigation Method | Agrowon

डिफ्यूजर सिंचन तंत्राने पाटपाण्याच्या तुलनेत ऐंशी टक्के पाणी वाचते.

Diffuser Irrigation Method | Agrowon
आणखी पाहा...