Mahesh Gaikwad
यंदा कासव संवर्धनामध्ये महाराष्ट्रातील गुहाघरने अव्वल स्थान मिळवले आहे.
कासवांच्या घरट्यांची संख्या, अंडी आणि जन्माला आलेल्या पिल्लांची संख्या पाहता यंदाच्या हंगामात ऑलिव्ह रिडले कासवांनी गुहाघरला सर्वाधिक पसंती दिली आहे.
ऑलिव्ह रिडले कासवाच्या माद्या दरवर्षी नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात.
यंदाच्या हंगामात गुहागर बाग आणि गुहागर बरचापाट येथील समुद्रकिनारी १६ डिसेंबर २०२३ ला कासवाचे पहिले घरटे आढळून आले होते.
तेव्हापासून आतापर्यंत घरट्यांची संख्या २२३ झाली असून त्यातीतल अंड्याची संख्या २३ हजार १९८ इतकी आहे. ही अंडी हॅचरीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली.
संवर्धनानंतर घरट्यातून कासवाची पिले बाहेर पडण्यास सुरूवात झाली आहे. १ मार्च रोजी ३२१ कासवांची पिले बाहेर पडली.
ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम मार्चमध्ये सुरू होतो. मोठ्या प्रमाणात पिले बाहेर पडण्यास सुरूवात झाल्याने कासवमित्र, वनकर्मचारी आणि वन्यप्राणिमित्र समाधानी आहेत.