Aslam Abdul Shanedivan
पावसाळा सुरू झाल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. डेंग्यू, मलेरीया आणि नव्यानेच झिका विषाणूचा प्रादुर्भावही वाढला आहे.
तर शरीरात प्लेटलेट्स कमी झाल्यास ताप, डोकेदुखी आणि उलट्या होऊन अशक्त येऊ शकतो. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन सी युक्त फळे खाणे फायदेशीर ठरते.
यामुळे अनेकदा आपल्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. अशा वेळी आपणास व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचे सेवन करायला हवे.
संत्री आणि पेरू ही फळे व्हिटॅमिन सी समृद्ध असून यात फायबर आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.
शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी रामबाण उपाय असणारे किवीचे सेवन करा. किवीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते पचायला सोपे होते.
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी डाळिंब फार उपयोगी पडते. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीरात लाल रक्तपेशी वाढवतात
पपईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फायबर असते. तर सफरचंदात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासही पपई आणि सफरचंद मदत होते. (अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)