Tomato Disease : असा ओळखा टोमॅटो पिकातील नुकसानकारक लवकर येणारा करपा

Team Agrowon

महाराष्ट्रात टॉमॅटो या फळभाजी पिकाची मोठ्या क्षेत्रात लागवड होते. प्रामुख्याने नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यांत टोमॅटो खालील क्षेत्र जास्त असते.

Tomato Crop Disease | Agrowon

टॉमॅटो पिकामध्ये मुख्यत: मर, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा आणि जिवाणूजन्य करपा या महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Tomato Disease | Agrowon

टॉमॅटो पिकातील लवकर येणारा करपा या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पाने, फळे आणि फांद्यांवर दिसून येतो.

Tomato Crop Disease | Agrowon

रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने, फांद्या सुकतात. या रोगामुळे टॉमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

Tomato Crop Disease | Agrowon

पानांवर सुरुवातीला तुरळक तपकिरी ठिपके पडतात. त्यानंतर हे ठिपके मोठे होऊन एकमेकांमध्ये मिसळतात. ठिपके अर्धा इंच वाढू शकतात.

Tomato Crop Disease | Agrowon

हे ठिपके अतिशय वेगळ्या प्रकारचे असतात. ठिपके जवळून पाहिले असता एकमेकांभोवती पडलेल्या वर्तुळाप्रमाणे हे दिसतात.

Tomato Disease | Agrowon

नवीन पानांवर देखील ठिपके दिसून येण्यास सुरुवात होते. हे ठिपके वाढत जाऊन पूर्ण पान वाळून जाते व गळून पडते. याचा परिणाम फळांच्या पोषणावर व संरक्षणावर होतो.

Tomato Disease | Agrowon

Food Processing Business : प्रक्रिया उद्योगासाठी कसं मिळवाल कर्ज आणि अनुदान? काय आहेत नियम, अटी आणि पात्रता

आणखी पाहा...