Onion Disease : अशी ओळखा कांदा पिकातील पिळया रोगाची लक्षणे

Team Agrowon

कांदा पिकात पिळया हा अतिशय महत्त्वाचा रोग आहे. सन २०२० पासून तो आपल्याकडे प्रकर्षाने दिसून येतो.

Onion Disease | Agrowon

मुख्यतः: खरिपात त्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. परंतु या वर्षी डिसेंबरमध्येही तो आढळून आला होता.

Onion Disease | Agrowon

रोपवाटिकेत आणि मुख्य शेतात रोपे खाली पडलेली दिसून येतात. पाने पिवळी पडतात.

Onion Disease | Agrowon

मान लांब होते. कांदा निमुळता व सडलेला किंवा नरम झालेला दिसतो. रोपांची मुळे आखूड होतात.

Onion Disease | Agrowon

कांद्याची पात पिळलेली, स्प्रिंगसारखी गोल झाल्यासारखी दिसते.

Onion Disease | Agrowon

पातीवर मध्यभागी किंवा खालील बाजूस लंब गोलाकार पांढरट चट्टा दिसतो. रोगाच्या वाढीच्या अवस्थेत चट्ट्यांवर काळ्या रंगाचे बीजाणू दिसू लागतात.

Onion Disease | Agrowon

सुक्ष्मदर्शकाखाली पिळ्या रोगाची बुरशी

Onion Disease | Agrowon