Swarali Pawar
बर्ड फ्लूची लक्षणे अचानक दिसतात आणि ती तीव्र असतात. कोंबड्या काही तासांतच खूप अशक्त होतात.
कोंबड्यांचे खाणे आणि पाणी पिणे थांबते. त्या सुस्त होऊन एका जागी बसून राहतात.
नाक व तोंडातून रक्तमिश्रित पाणी येते. हे बर्ड फ्लूचे गंभीर लक्षण मानले जाते.
डोळे, मान आणि डोक्याचा भाग सुजतो. कोंबडी वेदनेत असल्यासारखी दिसते.
श्वास घेताना घरघर आवाज येतो. कोंबड्यांना दम लागल्यासारखे होते.
विष्ठा हिरवी किंवा पातळ होते. पायांना सूज येते आणि चालताना अडखळतात.
अंडी देण्याचे प्रमाण खूप कमी होते. कधी कधी अंडी देणे पूर्णपणे बंद होते.
काही कोंबड्या लक्षणे न दाखवता मरतात. अशी मरतूक दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना कळवा.