Soil Pollution : ओळखा मातीची धूप, प्रदूषण होण्याची कारणे

Team Agrowon

गायरान, वने, पडीक जमिनी आणि परिसरातील झाडांची संख्या वेगाने कमी होत आहे. परिणामी, मातीची धूप वेगाने होत आहे.

Soil Pollution

शेतीमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर.

Soil Pollution

शेतातील काडीकचरा, गव्हाचा भुसा आणि उसाचे पाचट शेतातच जाळले गेल्याने सेंद्रिय कर्ब आणि उपयुक्त सूक्ष्मजीवही मोठ्या प्रमाणात जळून जातात.

Soil Pollution

शहरी आणि कारखान्यातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना सिंचनासाठी वापरले जाणे, हेही माती प्रदूषणाचे मुख्य कारण ठरत आहे.

Soil Pollution

पाण्यासोबत रसायने व कीडनाशके निचरा होऊन परीसरातील जलस्रोतांमध्ये आणि भूजलामध्येही मिसळली जात आहेत. परिणामी, पिण्याचे पाणीही प्रदूषित बनत चालले आहे.

Soil Pollution

जमिनीत सलग तीच पिके वारंवार घेतल्यास जमिनीतील पोषक घटकांचे प्रमाण वेगाने कमी होते.

Soil Pollution

जमिनीला योग्य बांधबंदिस्ती आणि मशागत न केल्यामुळे. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर माती व त्यातील सुपीक द्रव्ये वाहून जातात.

Soil Pollution