Mahesh Gaikwad
उन्हाळ्यात उन्हाच्या काहिलीपासून बचाव होण्यासाठी अनेक जण कोल्ड्रिंक, फळांचा ज्यूस, सरबत अशी पेये पितात.
आग ओकणाऱ्या उन्हापासून शरीराला थंडावा मिळावा, यासाठी ताक हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
ताक पिल्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात. तसेच उन्हाळ्यात उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी ताक पिणे फायदेशीर असते.
ताकामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. ताकातील प्रथिने शरीराला व स्नायूंना निरोगी बनवतात.
तसेच नियमित ताकाचे सेवनामुळे त्वचेची चमक वाढते.
ताकामध्ये जिरेपूड घालून प्यायल्यास पचनक्रियेची समस्या दूर होते.