Anuradha Vipat
तुमचे वजन किती असावे हे प्रामुख्याने BMI (Body Mass Index) वर अवलंबून असते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार, १८.५ ते २४.९ या दरम्यान असलेला BMI निरोगी मानला जातो.
१८.५ पेक्षा कमी BMI म्हणजे वजन कमी असणे, तर २५ पेक्षा जास्त म्हणजे जादा वजन होय.
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरात चरबीचे प्रमाण नैसर्गिकरित्या थोडे जास्त असते.
वाढत्या वयानुसार शरीरातील चरबी आणि स्नायूंचे प्रमाण बदलते, ज्याचा परिणाम वजनावर होतो.
जर तुम्ही जिम करत असाल किंवा खेळाडू असाल, तर स्नायूंमुळे तुमचे वजन जास्त दिसू शकते.
काही लोकांची हाडे जाड किंवा जड असतात त्यामुळे त्यांचे वजन थोडे जास्त असू शकते.