Ice Apple : उन्हाच्या असह्य झळांना गारेगार ताडगोळ्याचा उतारा

Mahesh Gaikwad

उन्हाळ्याची चाहूल

उन्हाळ्याची चाहूल लागताच आपोआपच पावले रसवंती गृह, आईसक्रीम पार्लरच्या दिशेने वळतात.

Ice Apple | Agrowon

शरीराचे तापमान

उन्हाळ्यात शरीराचे तापमान थंड राहण्यासाठी नारळपाणी, लस्सी, उसाचा रस, ताक अशी थंड पिण्याकडे जास्त कल असतो.

Ice Apple | Agrowon

ताडगोळा विक्री

उन्हाळ्यात शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला नारळासारखाच दिसणारं फळ विकणारे दिसतात. पण हे नारळ नसून ताडगोळे असतात.

Ice Apple | Agrowon

ताडाची झाडे

ताडाच्या झाडाला लागणाऱ्या या फळाला ताडगोळा असे म्हणतात. किनारपट्टीच्या भागात ताडची झाडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

Ice Apple | Agrowon

खायला रूचकर

ताडगोळा दिसायला अगदी नारळासारखाच पण मऊशार असतो. त्याची साल हिरव्या रंगाची असते. ताडगोळा खायलाही अत्यंत रुचकर लागतो.

Ice Apple | Agrowon

आईस अॅप्पल

ताडगोळा यालाच आईस अॅप्पल असेही म्हणतात. ताडगोळ्यातील पाण्याच्या गोड चवीमुळे अनेकांचा याकडे ओढा असतो.

Ice Apple | Agrowon

आरोग्याला चांगला

ताडगोळा थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगला असतो. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत होते.

Ice Apple | Agrowon
Filter Coffee | Agrowon