Swarali Pawar
या पद्धतीत मातीऐवजी पाणी, वाळू, खडी किंवा कोकोपीटचा वापर केला जातो. झाडांची मुळे पोषक द्रावणात राहतात आणि त्यातून अन्नद्रव्ये शोषून जलद वाढ होऊ शकते.
पालक, लेट्यूस, कोथिंबीर, काकडी, टोमॅटो, सिमला मिरची, तुळस तसेच स्ट्रॉबेरी आणि ब्ल्यूबेरीसारखी फळेही हायड्रोपोनिक्स पद्धतीने सहज पिकवता येतात.
या पद्धतीत फक्त १०० चौरस फूट जागेत सुमारे २०० रोपे लावता येतात. त्यामुळे जागा कमी असली तरी उत्पादन जास्त मिळते — घरगुती किंवा व्यावसायिक शेतीसाठी उत्तम.
साधारण शेतीपेक्षा हायड्रोपोनिक्समध्ये ९०% पाणी कमी लागते. पाण्याची कमतरता असलेल्या भागांत ही पद्धत मोठा पर्याय ठरू शकते.
नियंत्रित वातावरण असल्यामुळे झाडांना आजार व किडींचा त्रास कमी होतो. औषधांचा खर्चही कमी होतो आणि रासायनिक अवशेषमुक्त उत्पादन मिळते.
ऍक्टिव्ह पद्धत म्हणजे पाण्याचे पुनर्वितरण पंपाद्वारे केले जाते, वाढ जलद होते. तर पॅसिव्ह पद्धत म्हणजे कोकोपीट व हायड्रोस्टोन वापरून झाडांना पोषण पुरवले जाते.
सुरुवातीचा खर्च जरी जास्त वाटला तरी दीर्घकाळात उत्पादन व बाजारभावामुळे चांगला नफा मिळतो. विशेषतः वेगाने वाढणाऱ्या आणि मागणी असलेल्या भाज्यांनी जास्त उत्पन्न मिळते.