Aslam Abdul Shanedivan
मानवी आरोग्य आणि झोप यांचा जवळचा संबंध असून चांगल्या आरोग्यासाठी झोप महत्वाची आहे.
पूर्ण झोप आरोग्यासाठी लाभदायक असून यामुळे थकवा, कंटाळा नाहीसा होतो.
चांगल्या आरोग्यासाठी दिवसातून कमीत कमी आठ तास झोप घ्यायला हवी. मात्र अनेक कारणांनी झोप अपुरी राहते. अशा वेळी पुढील मार्ग अवलंबवा
रात्रीच्या वेळी तुम्हाला शांत झोप लागावी यासाठी झोपण्याची एक वेळ निश्चित करा. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही पाहणं टाळा.
चांगल्या झोपेसाठी पुस्तक वाचणे, ध्यान करणे किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम करण्यासह गरम पाण्याने आंघोळ करा.
झोपण्याआधी किमान ३० मिनिटे काम संपवून अंथरून गाठा. तसेच मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा.
चांगल्या झोपण्यासाठी चांगले वातावरण तयार करताना बेडरुममधील लाईट बंद करुन शांत वातावरण निर्मिती करा