Aslam Abdul Shanedivan
पावसाळ्यात बदलामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन टायफॉईड, मलेरिया यासारखे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता बळावते. अशा वेळी स्वच्छतेसह सकस आहाराकडे लक्ष द्यायला हवे.
अशावेळी शरीराला ऊर्जा देण्यासाठी फळांचे सेवन करू शकता. यामुळे शरीर निरोगी राहण्यासह रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते
लिची खूप स्वादिष्ट आणि शरिरासाठी फायदेशीर असणारे फळ असून यामुळे पचनक्रिया सुधारते
नासपतीचे सेवन पावसाळयात पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम फळ मानले जाते
पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर जांभूळ रामबाण उपाय असून यातील व्हिटॅमिन सी, फायबर आणि भरपूर प्रमाणातील आयर्न प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते
आयर्न आणि व्हिटॅमिन्सने परिपूर्ण असलेले डाळिंब शरीरातील रक्त वाढवण्याचे काम करते.
सफरचंदामध्ये पोटॅशियम, ग्लुकोज, फॉस्फरस, आयर्न आदी पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे पावसाळ्यात एक सफरचंद खायलाच हवे.