Anuradha Vipat
मिठी मारणे हे केवळ प्रेम व्यक्त करणे नसून त्याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही आश्चर्यकारक फायदे होतात.
जेव्हा आपण मिठी मारतो तेव्हा रक्तातील कोर्टिसोलची पातळी कमी होऊन मानसिक ताण आणि चिंता त्वरित कमी होते.
नियमितपणे आपल्या जवळच्या व्यक्तींना मिठी मारल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
मिठी मारल्याने हृदयावरचा ताण कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो
मिठी मारल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
मिठी मारल्याने एकटेपणाची भावना दूर होते. ज्यामुळे त्यांचा भावनिक विकास चांगला होतो.
झोपण्यापूर्वी जोडीदाराला किंवा जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने मन शांत होते आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
दिवसातून किमान ४ ते ८ वेळा मिठी मारणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते