Swarali Pawar
ड्रोन म्हणजे मानवरहित विमान जे रिमोट कंट्रोलने चालवले जाते. यामध्ये मोटार, पाती, कंट्रोलर, जीपीएस अशा घटकांचा समावेश असतो.
ड्रोनचे दोन मुख्य प्रकार आहेत, फिक्स्ड विंग आणि मल्टी रोटर. शेतीसाठी मल्टी रोटर ड्रोन सर्वाधिक वापरले जातात कारण ते किफायतशीर आणि सोपे असतात.
कीटकनाशके, बुरशीनाशके, अन्नद्रव्ये यांची अचूक फवारणी ड्रोनद्वारे करता येते. तसेच पिकांचे निरीक्षण, रोगांची ओळख आणि पाण्याचा ताण समजण्यासाठीही ड्रोन उपयुक्त आहेत.
ड्रोनद्वारे फवारणी चारपट वेगाने होते आणि पाण्याची ९०% बचत होते. यामुळे रसायनांचा प्रभावी वापर आणि मजुरीचा खर्च दोन्ही कमी होतात.
ड्रोनची DGCA प्लॅटफॉर्मवर नोंद असणे आवश्यक आहे. फवारणी क्षेत्र प्रतिबंधित नाही याची खात्री करा आणि सर्व नियंत्रण प्रणाली व्यवस्थित चालू आहेत हे तपासा.
पायलटला ड्रोन उडवण्याचे आणि रसायनांचा सुरक्षित वापराचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच फवारणीपूर्वी ग्रामपंचायतीला सूचना देणे बंधनकारक आहे.
सुरक्षात्मक कपडे व मास्क वापरा. हवामान तपासा, वाऱ्याचा वेग योग्य आहे याची खात्री करा. फवारणीची उंची आणि वेग ठरवूनच काम करा.
फवारणीनंतर यंत्रणा स्वच्छ करा, औषधांच्या बाटल्यांची सुरक्षित विल्हेवाट लावा. ड्रोनची नियमित तपासणी आणि देखभाल आवश्यक आहे.