Original Kanjeevaram Saree : कांजीवरम साडी आणि तिचे ओळखण्याचे सोपे मार्ग

Anuradha Vipat

प्रकार

कांजीवरम साडी हा दाक्षिणात्य संस्कृतीचा अभिमान आणि भारतातील सर्वात महागड्या व राजेशाही साड्यांपैकी एक प्रकार आहे.

Original Kanjeevaram Saree | agrowon

जरीची शुद्धता

अस्सल कांजीवरम साडीची जरी ही शुद्ध चांदीच्या तारेवर सोन्याचा मुलामा देऊन तयार केली जाते. साडीच्या पदराचे टोक किंवा एखादा सैल जरीचा धागा हलकासा खरवडून पहा. जर आतून तांबूस छटा दिसली, तर ती साडी १००% अस्सल आहे.

Original Kanjeevaram Saree | agrowon

साडी जाळून पाहणे

साडीच्या काठाचा किंवा पदराचा एक छोटा धागा काढा आणि तो पेटवून पहा. जर धागा जळताना मानवी केस जळल्यासारखा वास आला आणि शेवटी काळी राख तयार झाली, तर ते शुद्ध सिल्क आहे.

Original Kanjeevaram Saree | agrowon

साडीचे वजन आणि पोत

खरी कांजीवरम साडी वजनाला जड असते कारण तिच्यात दोन ते तीन धागे एकत्र विणलेले असतात. ही साडी हाताला अतिशय मऊ आणि गुळगुळीत लागते.

Original Kanjeevaram Saree | agrowon

पदर आणि बॉडीमधील सांधा

खऱ्या कांजीवरम साडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा पदर आणि साडीचा मुख्य भाग वेगळे विणले जातात आणि नंतर एकत्र जोडले जातात.

Original Kanjeevaram Saree | agrowon

सिल्क मार्कचे लेबल

खरेदी करताना साडीवर भारत सरकारद्वारे प्रमाणित 'Silk Mark' चा होलोग्रॅम किंवा टॅग आहे की नाही हे नक्की तपासा. हा टॅग साडीच्या शुद्धतेची हमी देतो.

Original Kanjeevaram Saree | agrowon

अस्सल कांजीवरम

अस्सल कांजीवरम साडी कधीही खूप स्वस्त मिळत नाही. जर कोणी तुम्हाला ही साडी अगदी कमी किमतीत देत असेल, तर ती आर्ट सिल्क किंवा सिंथेटिक साडी असण्याची शक्यता ९९% असते.

Original Kanjeevaram Saree | agrowon

Homemade Cleaners : केमिकलमुक्त घरगुती क्लिनर कसे तयार करावेत?

Homemade Cleaners | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...