Anuradha Vipat
सकाळी लवकर उठणे हे केवळ इच्छाशक्तीवर अवलंबून नसून, ते तुमच्या शरीराला शिस्त लावण्यावर अवलंबून असते.
जर तुम्ही अनेक प्रयत्न करूनही उशिरा उठत असाल, तर '५ दिवसांचा हा वैज्ञानिक फॉर्म्युला' तुमची ही सवय कायमची बदलू शकतो.
सकाळी उठण्याचा अलार्म लावण्याऐवजी, रात्री झोपण्याच्या १ तास आधीचा अलार्म लावा.
तुमचा मोबाईल किंवा अलार्म घड्याळ बेडच्या शेजारी न ठेवता, खोलीत दुसऱ्या कोपऱ्यावर किंवा टेबलवर ठेवा.
अलार्म बंद केल्यावर मनातल्या मनात ५-४-३-२-१ उलटी गणना करा आणि विचार न करता थेट उभे राहा. त्यानंतर लगेच १ मोठा ग्लास ताजे पाणी प्या.
उठल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत बाल्कनी किंवा खिडकीपाशी जाऊन नैसर्गिक सूर्यप्रकाश अंगावर घ्या आणि ५ मिनिटे हलके स्ट्रेचिंग करा.
पाचव्या दिवशी आठवड्यासारखेच ठरलेल्या वेळेवर उठा.