Swarali Pawar
पेरणी यंत्र वापरत असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. लहान चुका उगवण कमी करून उत्पादनावर परिणाम करू शकतात.
पेरणीपूर्वी यंत्राची खोली, अंतर आणि बियाण्याचे प्रमाण तपासा. चुकीची सेटिंग झाल्यास रोपांची संख्या कमी-जास्त होऊ शकते.
बियाणे खूप खोल पेरल्यास उगवण कमी होते किंवा बियाणे कुजू शकते. पिकानुसार योग्य खोली राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बियाणे योग्य अंतरावर पडणे आवश्यक आहे. दाटी झाल्यास हवा, प्रकाश आणि अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा वाढते.
पहिला पाऊस पडला म्हणून लगेच पेरणी करू नका. पुरेसा पाऊस आणि योग्य वाफसा आल्यानंतरच पेरणी करा.
अतिजड ट्रॅक्टरमुळे जमीन जास्त दाबली जाऊ शकते. पेरणीसाठी ३५ ते ४५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर योग्य ठरतो.
जास्त वेगात पेरणी केल्यास बियाणे समान अंतरावर पडत नाही. ट्रॅक्टरचा वेग ताशी ५ किमीपेक्षा जास्त ठेवू नका.
खत बियाण्यांच्या थेट संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. यामुळे उगवण चांगली होते आणि रोपांची वाढ जोमदार राहते.