Anuradha Vipat
हात आणि बोटांचे सौंदर्य वाढवण्यात नखांची महत्त्वाची भूमिका असते.
अनेकदा पोषक घटकांची कमतरता किंवा जास्त वेळ पाण्यात काम केल्यामुळे नखे कमजोर होऊन तुटू लागतात.
रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडे खोबरेल तेल कोमट करा. या तेलाने नखांवर आणि क्युटिकल्सवर ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.
लसणाची एक पाकळी सोलून ती मध्यभागातून कापून घ्या. ही कापलेली पाकळी नखांवर १० मिनिटे हळूहळू चोळा.
लिंबाचा रस काढून घ्या आणि कापसाच्या मदतीने तो नखांवर लावा. ५ मिनिटांनी कोमट पाण्याने हात धुवून घ्या.
बदाम तेलात काही थेंब लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण नखांवर लावून मालिश करा. नखे वारंवार तुटत असतील तर हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.
ऑलिव्ह ऑइल नखांच्या थरांमध्ये खोलवर शोषले जाते, ज्यामुळे नखांचा कडकपणा आणि कोरडेपणा कमी होतो.