Fertilizer Use : खताचा योग्य वापर कसा करायचा?

Team Agrowon

कोणत्याही पिकांच्या उत्पादनासाठी नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम या सारखी १६ पोषकद्रव्ये आवश्यक आहेत.

Fertilizer Use | Agrowon

कोणत्याही पिकांच्या उत्पादनासाठी नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम या सारखी १६ पोषकद्रव्ये आवश्यक आहेत. माती परीक्षणानंतर जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, हे लक्षात येते.

Fertilizer Use | Agrowon

नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा म्हणजेच निमकोटेड युरिया किंवा सल्फर कोटेड युरियाचा वापर करावा. हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात.

Fertilizer Use | Agrowon

पिकांच्या वाढीसाठी किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयाची याच्या शिफारशी कृषी विद्यापीठांकडून प्रसारित केल्या जातात. त्याचा आधार घेऊन आवश्यक ती भर खते, वर खते पिकांना द्यावी लागतात.

Fertilizer Use | Agrowon

रासायनिक खतांची निवड करताना दीर्घकालीन पिकांसाठी नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५,अमोनियम फॉस्फेट यासारख्या संयुक्त खतांचा वापर करावा.

Fertilizer Use | Agrowon

स्फुरद या अन्नद्रव्याची उपलब्धता सोपी होण्यासाठी पूर्णपणे विरघळणाऱ्या खतांची निवड करावी. यामध्ये सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट यासारख्या खताचा समावेश होतो.

Fertilizer Use | Agrowon

स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू म्हणजेच पि.एस.बी. खतांचा वापर करावा. डाळवर्गीय आणि तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करावा.

Fertilizer Use | Agrowon
आणखी पाहा