Anuradha Vipat
कढीपत्ता आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण केसांच्या वाढीसाठी एक उत्तम आयुर्वेदिक आणि नैसर्गिक टॉनिक मानले जाते.
कढीपत्त्यामध्ये बीटा-कॅरोटीन, प्रथिने, आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे केसांचे गळणे थांबवून मुळांना मजबूत करतात.
कढीपत्त्यातील प्रथिने आणि अमिनो ॲसिड केसांच्या फॉलिकल्सना पोषण देतात. यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते.
खोबरेल तेल आणि कढीपत्ता मुळांना घट्ट पकडून ठेवण्यास मदत करतो. या दोन्हीच्या एकत्र वापरामुळे केस तुटणे आणि गळणे कमी होते.
कढीपत्त्यात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे तेल टाळूवरील मृत त्वचा साफ करते आणि कोंड्याची समस्या मुळापासून नष्ट करते.
खोबरेल तेल केसांना नैसर्गिक मॉइश्चरायझर पुरवते, तर कढीपत्ता केसांचा कोरडेपणा दूर करतो. यामुळे केस सिल्की, मऊ आणि चमकदार दिसतात.
कढीपत्त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन 'बी' आणि इतर पोषक घटक के वयाआधीच केस पांढरे होणे थांबते आणि केस नैसर्गिकरीत्या काळे व चमकदार होतात.