Anuradha Vipat
आयुर्वेदात भृंगराजला 'केसांचा राजा' म्हटले गेले आहे. त्याचे मुख्य ५ आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे आहेत.
केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि डोक्याच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी भृंगराज तेल हे सर्वात प्रभावी मानले जाते.
भृंगराज तेलामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि केस मुळापासून मजबूत होऊन गळती थांबते.
नवीन केस येण्यास मदत होते आणि केसांची लांबी व घनता नैसर्गिकरित्या वाढते.
डोक्याच्या त्वचेवरील कोंडा पूर्णपणे साफ होतो आणि कोरडेपणामुळे येणारी खाज किंवा संसर्ग दूर राहतो.
कोवळ्या वयात केस पांढरे होण्याची समस्या असल्यास भृंगराज तेलाच्या नियमित वापराने केस पुन्हा काळे आणि चमकदार बनतात.
रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने डोक्याला मसाज केल्यास दिवसाभराचा मानसिक ताण, थकवा आणि डोकेदुखी दूर होते, ज्यामुळे शांत झोप येण्यास मदत होते.