Banana Peel Skin care : डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी केळीच्या सालाचा वापर

Anuradha Vipat

अत्यंत प्रभावी

केळी खाल्ल्यानंतर आपण त्याचे साल फेकून देतो, पण हेच साल डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.

Banana Peel Skin care | Agrowon

पोषण

केळीच्या सालामध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी, ई आढळतात, जे त्वचेला आतून पोषण देतात.

Banana Peel Skin care | Agrowon

थेट मसाज

केळीच्या सालाचा आतला पांढरा भाग डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर ठेवा. त्यानंतर १० ते १५ मिनिटे अगदी हलक्या हाताने गोलाकार मसाज करा.

Banana Peel Skin care | Agrowon

बनाना पील आणि कोरफड जेल

केळीच्या सालाच्या आतला पांढरा गर चमच्याने खरवडून काढा. या गरामध्ये १ चमचा ताजे कोरफड जेल मिक्स करा. ही पेस्ट डोळ्यांखाली लावून १० मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

Banana Peel Skin care | Agrowon

आईस पॅक पद्धत

केळीचे साल वापरण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. हे थंड झालेले साल डोळ्यांवर ठेवून १५ मिनिटे शांत झोपा.

Banana Peel Skin care | Agrowon

नियमितता

चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा हा उपाय नक्की करा.

Banana Peel Skin care | Agrowon

डोळ्यांच्या आत

केळीचा गर लावताना तो डोळ्यांच्या आत जाणार नाही याची काळजी घ्या.

Banana Peel Skin care | Agrowon

Vitamin C Fruits : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'ही' ५ फळे आहेत सर्वोत्तम; शरीराला मिळेल भरपूर व्हिटॅमिन-सी

Vitamin C Fruits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...