Anuradha Vipat
अश्वगंधा ही आयुर्वेदातील अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक औषधी वनस्पती मानली जाते.
नियमितपणे योग्य प्रमाणात अश्वगंधाचे सेवन केल्याने केवळ शारीरिक ताकदच वाढत नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन अनेक आजारांपासून बचाव होतो.
यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे वारंवार होणारे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी-खोकला आणि इतर आजारांचा धोका कमी होतो.
अश्वगंधा हे एक उत्कृष्ट 'अॅडॉप्टोजेन' आहे. हे शरीरातील 'कोर्टिसोल'ची पातळी कमी करून मानसिक शांतता देते.
ज्यांना रात्री निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अश्वगंधा रामबाण उपाय आहे. यामुळे मेंदू शांत होतो आणि गाढ झोप लागते.
हे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढवण्यास आणि पुनरुत्पादक आरोग्य सुधारण्यास मदत करते
अर्धा चमचा (सुमारे ३ ते ५ ग्रॅम) अश्वगंधा पावडर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत किंवा मध घालून घ्यावी.