Anuradha Vipat
कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि चयापचय वाढवणारे घटक असतात.
कोरफड शरीरातील नको असलेली चरबी कमी करण्यास आणि पचनक्रिया गतिमान करण्यास मदत करते.
कोमट पाण्यात १ ते २ चमचे ताजा कोरफडीचा जेल मिक्स करा. सकाळी उठल्यावर सर्वात आधी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे.
१ ग्लास पाण्यात १ चमचा कोरफडीचा रस आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळा. सकाळी नाश्त्यापूर्वी किंवा वर्कआऊट केल्यानंतर प्या.
१ चमचा कोरफडीचा रस आणि १ चमचा आवळ्याचा रस एकत्र करून अर्धा ग्लास पाण्यात मिसळा. सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारच्या जेवणाआधी प्या.
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या २० ते ३० मिनिटे आधी १ चमचा कोरफडीचा रस पाण्यासोबत घ्या.
हिरव्या पालेभाज्या , काकडी आणि १ चमचा कोरफडीचा गर एकत्र करून मिक्सरमध्ये स्मूदी बनवून घ्या.