Anuradha Vipat
घरातील जुने कपडे टाकून न देता किंवा कपाटात तसेच पडून न ठेवता त्यांचा कल्पकतेने पुनरवापर करणे हा एक उत्तम आणि पर्यावरणपूरक मार्ग आहे.
आईच्या किंवा आजीच्या कपाटातील जुन्या काठपदर साड्या, सिल्की साड्या किंवा पैठणीचा वापर करून तुम्ही मॉडर्न कपडे शिवू शकता.
साडीपासून लांब घेरदार अनारकली ड्रेस, लेहेंगा-चोली, लॉंग गाऊन, श्रग किंवा स्टाईलिश कुर्ती सहज बनवता येते.
जुने सुती किंवा डिझायनर कपडे, जसे की ओढण्या, कुर्ते किंवा न वापरल्या जाणाऱ्या चमकदार साड्या कापून तुम्ही घर सजवण्यासाठी वापरू शकता.
जुन्या जीन्सच्या मागच्या खिशांचा वापर करून मोबाईल पाऊच, भाजी आणण्यासाठी मजबूत तोते बॅग , किंवा कॉलेजसाठी स्टाईलिश साईड बॅग घरीच शिवता येते.
कपड्यांच्या लांब पट्ट्या कापून, त्यांची वेणी विणून गोल किंवा चौकोनी आकर्षक पायपुसणी बनवता येते.
लहान मुलांसाठी मऊ सुती कपड्यांची गोधडी किंवा गादीचे कव्हर शिवता येते.