Swarali Pawar
द्राक्षांना बाजारात कधी कधी अपेक्षित दर मिळत नाही. अशा वेळी द्राक्षांपासून बेदाणा तयार करणे शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
द्राक्षांपेक्षा बेदाण्याला अनेकदा बाजारात चांगला दर मिळतो. त्यामुळे अनेक शेतकरी द्राक्षे सुकवून बेदाणा बनवण्याकडे वळत आहेत.
साधारणपणे ४ किलो द्राक्षांपासून १ किलो बेदाणा तयार होतो. द्राक्षातील साखर आणि हवामानावर बेदाण्याची गुणवत्ता अवलंबून असते.
काही ठिकाणी द्राक्षे तोडण्याऐवजी वेलीवरच सुकवली जातात. योग्य हवामान असेल तर द्राक्ष मणी काही दिवसांत सुकू लागतात.
या पद्धतीत प्रथम वेलीला दिले जाणारे पाणी कमी केले जाते. यामुळे द्राक्ष मण्यांमध्ये साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
इथाईल ओलिएट आणि पोटॅशियम कार्बोनेटचे द्रावण द्राक्षघडांवर फवारले जाते. ही फवारणी दोन ते तीन वेळा केल्यास मणी लवकर सुकण्यास मदत होते.
साधारण १२ ते १४ दिवसांत द्राक्षांपैकी अनेक मणी सुकू लागतात. यानंतर घड खाली काढून सावलीत अंतिम सुकवणी केली जाते.
प्रत्येक बागेतील परिस्थिती वेगळी असते. म्हणून ही पद्धत वापरण्यापूर्वी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.