Team Agrowon
जास्त तापमानामुळे पपई ची पानं करपण, फळावर चट्टे पडण, फळातील गर खराब होऊन फळे पिवळी पडून गळतात. तर पेरुच्या आंबे बहरातील फळांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
पपई पिकाला सरासरी २२ ते २६ अंश सेल्सिअस तापमान मानवत. पण तापमानाचा पारा ४० च्या वर गेल्यास जमिनीतील तापमानामुळे उष्णतेचा परिणाम मुळांवर होतो. त्यामुळे मुळे खराब होतात.
पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पानांवर १ ते दीड टक्के पोटॅशिअम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी.
बागेभोवती वारा प्रतिबंधक कुंपण केल्यासही बागेच उन्हापासून संरक्षण होतं. नवीन लागवड केलेल्या झाडांना गोणपाट किंवा जुन्या साड्या लावून सावली करावी.सायंकाळच्या वेळी संपूर्ण झाडावर एक दिवसाआड पाण्याचा फवारा पंपाने करावा.
झाडावर ५ ते ८ टक्के तीव्रतेच्या बाष्परोधकाची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.याशिवाय झाडाच्या आळ्यात मटाका सिंचनाने पाणी दिले तरी जमिनीत ओलावा टिकून राहतो.
बागेला ठिबक सिंचनाद्वारे शक्यतो रात्रीच्या वेळी पाणी द्यावं. झाडाच्या खोडाच्या चारही बाजूंनी शेतातील उरलेल्या काडीकरचऱ्याचं आच्छादन कराव. आच्छादनाचा थर साधारणपणे ३ ते ४ इंच इतका खोडाच्या चारही बाजूंनी करावा.
बागेत ६० ते १०० मायक्रॉन जाडीच काळ्या रंगाच प्लॅस्टिक आच्छादन कराव. झाडावर ५ ते ८ टक्के तीव्रतेच्या बाष्परोधकाची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
Pickle Making : लोणचं खराब होऊ नये म्हणून वापरा या ट्रिक्स